चोपड्यात शिवपंथी सत्संग कार्यक्रम तसेच विशेष नशामुक्ती अभियान १७ डिसेंबर रोजी
चोपडा (हेमकांत गायकवाड):-शहरातील बोरोले नगर-३ जुना धनवाडी रोड येथे १७ डिसेंबर रोजी रात्री ८.०० वा. शिवपंथी सत्संग कार्यक्रम व विशेष नशामुक्ती अभियान कार्यक्रम होणार आहे.
या संदर्भात पंकज विद्यालय चोपडा येथे या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल याबद्दल नियोजन बैठक पार पडली या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती डॉ.बोरोले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ.चंद्रकांत बारेला व शिवपंथी सत्संगचे अनेक सदस्य उपस्थित होते.