Maharashtra247

दारूसाठी पैसे न दिल्याने एकास गावठी कट्टा लावून जिवे मारण्याची धमकी

अहमदनगर (दि.१५ नोव्हेंबर):-दारूसाठी पैसे न दिल्याने एकास गावठी कट्टा लावून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नेवासा तालुक्यातील येथील घोडेगाव सोनई चौक येथे मंगळवारी (14 नोव्हेंबर) रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,फिर्यादी रामदास जाधव घरी असताना आरोपी निलेश हा विनानंबरची स्प्लेंडर मोटारसायकलवर घरासमोर आला व फिर्यादीस दारु पिण्यासाठी पैशाची मागणी करु लागला.फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपी केदारी याने फिर्यादीस शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या दुचाकीला आरोपीने त्याच्या दुचाकीने धडक दिली.तेव्हा दोघेही खाली पडल्याने किरकोळ दुखापत झाली.आरोपीने उठुन फिर्यादीस तुझ्यामुळे मला लागले आहे असे म्हणुन फिर्यादीस मारहाण करत खिशातील 5200 रुपये बळजबरीने काढून घेतले.

तसेच आरोपीने गावठी कट्टा काढून फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी 494/2023 भा.द.वि.327, 323, 504, 506 आर्म अ‍ॅक्ट 3/25 नुसार सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सोनई पोलिस हे करत आहेत.

You cannot copy content of this page