Maharashtra247

अहमदनगर महसुल विभागाला पालकमंत्र्यांच्या हस्ते नवीन वाहनांचे वितरण

अहमदनगर (दि.१६ नोव्हेंबर):-महसुल विभागातील प्रांत अधिकारी व तहसिलदार यांना नव्याने मंजूर झालेल्या वाहनांचे वितरण राज्याचे महसुल,दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

शासनाकडून प्राप्त झालेल्या नऊ वाहनांचे उपविभागीय अधिकारी, अहमदनगर, कर्जत तसेच तहसिलदार, पाथर्डी, शेवगाव, अहमदनगर, कोपरगाव, संगमनेर, जामखेड व राहुरी यांना पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते वाहनांच्या चाव्या वितरित करण्यात आल्या.

You cannot copy content of this page