
अहमदनगर (दि.१९ नोव्हेंबर):-भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सरचिटणीसपदी सामाजिक कार्यकर्त्या सौ.श्वेताताई पंधाडे झोंड यांची नुकतीच निवड झाली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल विधानसभा प्रमुख तथा मनपा नगरसेवक भाजपा शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी सत्कार केला व पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवुन महिला सक्षमिकरणासाठी काम करणार असल्याचे नूतन भारतीय जनता महिला मोर्चा सरचिटणीस श्वेता पंधाडे झोंड या म्हणाल्या.
त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच पक्षाच्या माध्यमातून यापुढे ही विविध नागरिकांच्या जनहिताच्या योजना राबवून नागरिकांना न्याय देण्याचे प्रामाणिकपणाने काम करणार असल्याचे त्या म्हणाल्या.त्यांच्या निवडीबद्दल सर्व क्षेत्रातील तसेच शहरातही अभिनंदन होत आहे.