
प्रतिनिधी (दि.२० नोव्हेंबर):-धनगर समाजाच्या आरक्षण प्रकरणी सरकारकडून मुंबई महानगर पालीकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

धनगर समाजाचा अनुसुचित जातीत समावेश करण्यासाठी ही समिती गठित करण्यात आली आहे.

या समितीमध्ये मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदेच्या अध्यक्षतेखाली ९ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.राज्यातील धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करण्यात यावा अशी मागणी मागील बऱ्याच काळापासून केली जात आहे.
या मागणीची दखल घेत राज्य सरकारने अनुसूचित जमातींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचे लाभ धनगर समाजाला देण्याचा निर्णय घेतला होता.
यानंतर आता यासाठी एक नऊ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.ही समिती मध्यप्रदेश,बिहार, तेलंगणा राज्यांनी त्याच्या अधिकारामध्ये जाती निहाय यादीमध्ये असलेल्या समाजाला लाभ उपलब्ध करून देण्यात आलेल्या योजनांचा अभ्यास करणार आहे. तीन महिन्याच्या आत समिती शासनाला अहवाल सादर करणार आहे.