
पारनेर प्रतिनिधी (दि.२५ नोव्हेंबर):-महाराष्ट्रात शेतरस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असुन दिवसेंदिवस फौजदारी स्वरूपच्या घटना वाढत चालल्या असुन भावाभावात,शेतकऱ्यांमध्ये आपापसात मोठे वाद निर्माण झाले असुन भविष्यात निर्माण होणार अनर्थ टाळण्यासाठी राज्यव्यापी शिव पाणंद शेतरस्ता चळवळ उभी केली असुन शेतकऱ्यांना शेत तिथे रस्ता मिळून देवुन शेवटच्या शेतकर्याला न्याय देण्यासाठी संघर्ष करणार आहे असे शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी म्हटले आहे.

सरकार बदलते शासन निर्णय बदलतात परंतु त्याची अंमलबजावनी होत नाही यासाठी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन शेतकर्यांच्या समस्या समजुन घेत प्रशासकीय,न्यायालयीन पातळीवर काम सुरू केले असुन शेतरस्त्यासाठी न्याय मिळवत तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे चळवळीच्या वतीने जिल्हयात शिवपानंद शेतरस्त्यांच्या नंबरींचे सर्वेक्षण करून नंबरी हलवणाऱ्यांना दंड सुरू करा,जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हयातील सर्व तहसील कार्यालयातील प्रलंबित शेतरस्ता केसेस निकाली काढण्याचे तातडीने आदेश द्यावेत,समृद्ध गावांसाठी ग्रामस्तरीय शेतरस्ता समित्यांची स्थापना करून समित्यांच्या कार्यवाहीचा अहवाल शासनाने घ्यावा,चालू वहीवाटीच्या प्रत्येक शेतरस्त्याचे सर्वेक्षण करून ग्रामपंचायतींना नोंदी करून घेण्याचे आदेश द्यावेत,शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा.
मा.उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल याचिका क्रमांक ८२४७ /२०२३ रोजीच्या निकालानुसार ६० दिवसांत शेत रस्ते खुले करा,नकाशावरील शेतरस्त्यांच्या मोजणी व संरक्षण फी बंद करा,तहसीलसह प्रशासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करा,शिवपानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चित करून समृद्ध गावांसाठी दर्जेदार शेतस्ते करा,मुख्यमंत्र्यांसह संबंधित प्रशासकीय कार्यालयाकडे शेतरस्त्यांसाठी पाठपुरावा करूनही न्याय न मिळालेने १८/१२/२०२३ रोजी अहमदनगर जिल्हाधिकार्यालयावर शेतकऱ्यांच्या वतीने पेरू वाटप आंदोलन करण्यात येईल शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने मागणीवजा आंदोलनाचा ईशारा दिला असून शेतीची वाढत चाललेली तुकडेवारी शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब झाली आहे शेतीमाल बाजारात पोहोचवण्याकरता व पेरणी अंतर्मशागत कापणी मळणी या स्वरूपाची यंत्रसामग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेती पुरक व्यवसाय सर्पदंश विज पडणे पुर येणे आग लागणे यास्वरूपाच्या आपत्कालीन घटनांमुळे जीवितहानीचे वाढते धोके त्याच बरोबर शेतकरी शेतीत वास्तव्यास असून शालेय विद्यार्थ्यांना,शेतकऱ्यांना दळणवळणासाठी शेतीला बारामाही दर्जेदार शेतरस्त्यांची आवश्यकता असल्याचे निदर्शनात आणत वेळोवेळी निवेदने आंदोलने करून न्याय न मिळाल्याने या संदर्भात अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात प्रलंबित शेतरस्त्यांच्या प्रश्नासाठी,शेत तिथे रस्ता व तहसीलवर शुन्य शेतरस्ता केस ठेवाव्यात अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.१८/१२/२०२३ रोजी शेतकऱ्यांकडून पेरू वाटप आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने गांभिर्याने दखल घ्यावी यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले असुन याच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राधाकृष्ण विखे पाटील महसूलमंत्री, ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे,पोलिस अधिक्षक कार्यालय अहमदनगर यांना देण्यात आल्या आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे ,संदीप कोल्हे, संदीप मावळे, भाऊसाहेब वाळुंज , दशरथ वाळुंज, विठ्ठल शिंदे, होशीराम कुंदन, संजय साबळे, दत्तात्रेय पवार, रामदास लोणकर,विशाल सोनवणे, प्रविन गायकवाड, उद्धव कुलट, पंढरीनाथ गाडगे, सुनिल गायकवाड आदी शेतकरी उपस्थित होते.