
राहता प्रतिनिधी (दि.२५ नोव्हेंबर):-दि.२५ नोव्हेंबर २०२३ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,

राहता तालुक्यातील ममदापूर शिवारात अनिल उंडे यांच्या शेत जमिनीत एका पांढरे रंगाचे मॅक्स पिकप गाडीमध्ये कत्तली करीता गोवंश जातीचे जनावरे आणले आहेत.अशी गुप्त माहिती मिळाल्याने डीवायएसपी संदीप मिटके यांनी पथकातील अंमलदार यांना त्या ठिकाणी जाऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथकातील अंमलदार यांनी ममदापूर गावातील त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता शेतामध्ये एक पांढरे रंगाचे पिकअप व त्यामध्ये गोवंश जातीचे जनावरे दाटीवाटीने भरलेले ओरडताना मिळून आले.
पिकअप मधील व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्यांनी त्याचे नाव सुफियान मेहबूब कुरेशी (रा.ममदापूर तालुका राहता)असे सांगितले त्याच्या ताब्यातील पिकअप वाहनाची पाहणी करता त्यामध्ये गोवंश जातीचे 32 जनावरे मिळून आले त्यांचे समोर चारा पाण्याची कुठल्याही प्रकारची सोय न करता उपाशी ठेवून कत्तली करिता एकत्र वाहनांमध्ये जमा करून ठेवले म्हणून या इसमास व पिकअप मधील गोवंश जातीचे जनावरासह असा एकूण सहा लाख तीस हजार रुपयेचा मुद्देमाल ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. 685/2023 महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 (सुधारित2015) चे कलम 5(अ).5(क).9(अ)9(ब) सह प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11(च)(ज) पोकॉ/दिनेश कांबळे यांच्या फिर्यादी वरून लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर श्रीरामपूर विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोना/अशोक शिंदे,असीर सय्यद, पोना/राशिनकर,पोकॉ/दिनेश कांबळे,पोकॉ/मच्छिंद्र इंगळे, पोहेकॉ/थोरमिसे यांनी केली आहे.