बसस्थानकावरील चोऱ्या कमी करण्यासाठी कोतवाली पोलिसांची पूर्ण वेळ पोलिसांसह ही उपायोजना
अहमदनगर (दि.२५ नोव्हेंबर):-बस स्थानकावरील चोऱ्या कमी करण्यासाठी कोतवाली पोलिसांनी एक उपायोजना केली आहे.
पूर्णवेळ पोलिसांसह नागरिकांना जागरूक ठेवण्यासाठी पुणे बसस्टँड व माळीवाडा बसस्टॅन्ड या दोन्ही बस स्थानकावर लावली स्पीकर यंत्रणा,सर्वसामान्य गोरगरीब नागरिक महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या बसने प्रवास करत असतात.प्रवासादरम्यान अनेक वेळा चोऱ्या होत असतात.बस मध्ये चढताना तसेच उतरताना गर्दीच्या वेळी चोरटे त्याचा फायदा घेऊन चोऱ्या करतात.
यापूर्वी चोऱ्या करणाऱ्या अनेक टोळ्या कोतवाली पोलिसांनी पकडल्या आहेत.यापुढे कोतवाली पोलिसांनी चोऱ्या होऊ नये यासाठी पुढाकार घेतला असून दोन्ही बस स्थानकावर पूर्ण वेळ पोलिसांची नेमणूक केली आहे.त्यासोबतच नागरिकांनी स्वतःचे किमती साहित्य, मोबाईल,रोख रक्कम याची काळजी घेण्यासाठी जागरूक राहण्यासाठी त्यांना सूचना देण्यासाठी नवीन स्पीकर सिस्टम कायमस्वरूपी लावण्यात आले आहे.त्या ठिकाणी हजर असलेले पोलीस त्या माइक सिस्टम वरून प्रवाशांना सूचना देतील.
त्यामुळे चोरीचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल.ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस जवान गणेश धोत्रे,सोमनाथ राऊत,योगेश भिंगारदिवे,प्रमोद लहारे यांनी केली आहे.