Maharashtra247

समतेचा विचार पेरणाऱ्या सर्व महापुरुषांची जिल्ह्यात स्मारके उभारण्याची रिपाईची मागणी;रिपाई जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अहमदनगर (दि.२४ नोव्हेंबर):-अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत नगर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याची मागणी मान्य करत तसे आदेश प्रत्येक नगरपंचायतीच्या सीईओला देण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याच्या आदेशाचे स्वागत करीत याच प्रस्तावात समतेचा विचार पेरणारे महात्मा ज्योतिबा फुले,छत्रपती शाहूजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक देखील उभे करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर नगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

यावेळी कुमार भिंगारे, सोमा भागवत,दीपक भिंगारदिवे,विशाल इंगळे, अमित काळे,किरण दाभाडे, सोपान गाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

You cannot copy content of this page