
अहमदनगर (दि.१ डिसेंबर):-अहमदनगर जिल्ह्यात लाच मागण्याचे प्रमाण वाढले असून मागील महिन्यात एमआयडीसीतील दोन अधिकारी एक कोटीची लाच मागताना रंगेहात पकडले होते.
त्यातच अहमदनगर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक संतोष जाधव यांना अँटी करप्शन विभागातील पथकाने बावीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.
अशी माहिती समोर येत असून एका गावातील सभा मंडपाचे काम झाल्यानंतर बिल काढण्यासाठी ही लाच मागितली असल्याची माहिती समोर आली आहे.याप्रकरणी उशिरा पर्यंत शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.याने जिल्यात एकच खळबळ उडाली आहे.