
अहमदनगर (दि.१० डिसेंबर):-नेवासा तालुक्यातील चांदा येथे कत्तलीसाठी आणलेले 12 गोवंशीय जनावरे व 200 किलो गोमांस असा एकुण 2,05,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने माहिती घेवुन कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी पथक नेमुण त्यांना अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेकामी सुचना देवुन पथकास रवाना केले.
पोलीस पथक सोनई पोलीस ठाणे हद्दीमधे अवैध धंद्याची माहिती काढत असतांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,इसम नामे जावेद इमाम शेख (रा.कुरेशी मोहल्ला चांदा,ता.नेवासा) या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशी जनावरांचे कत्तल करण्याची मनाई असतांना गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने आणुन त्यांची कत्तल करत असल्याची बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी पंचासह जावुन छापा टाकला असता तेथुन काही इसम पळुन गेले.
सदर ठिकाणी मिळुन आलेल्या इसमांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1)जावेद इमाम शेख 2)मोहंमद कैफ शेख 3)सईद बाबु शेख 4) उजेर शकील शेख सर्व रा. चांदा ता.नेवासा असे असल्याचे सांगितले.तसेच पळुन गेलेल्या इसमांची नावे 5) मुजकिर जावेद शेख, 6) आबु रशिद शेख दोन्ही रा. चांदा ता.नेवासा असे असल्याचे समजले.सदर ठिकाणची पंचासमक्ष झडती घेता सदर ठिकाणी 40,000/- रुपये किमतीचे 200 किलो गोमांस,तसेच कत्तल करण्यासाठी आणलेले 12 जिवंत गोवंशीय जनावरे, सत्तु, सुरे असा एकुण 2,05,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या बाबत पोकॉ/782 किशोर आबासाहेब शिरसाठ नेम स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. 524/2023 भादवी कलम 269, 34 महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015चे कलम 5 (अ), (ब), (क), 9 व प्राण्यांना निर्दयतेने वागविणेचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील कायदेशिर कारवाई सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.हि कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर,श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी,शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव,सफौ/भाऊसाहेब काळे,पोहेकॉ/मनोहर गोसावी,पोना/ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे,संतोष लोढे, संदीप दरंदले,पोकॉ/शिवाजी ढाकणे,चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर यांनी केलेली आहे.