राहता तालूक्यातील निर्मळ पिंपरी येथे दोन कुटुंबावर जीवघेणा हल्ला होऊन या घटनेला पाच दिवस होऊनही यातील ६८ आरोपी अद्यापही पसार रीपाई आक्रमक;१२ डिसेंबर रोजी नगर मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन-रीपाई जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात
राहुरी प्रतिनिधी (दि.१० डिसेंबर):-राहता तालूक्यातील निर्मळ पिंपरी येथे दोन कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाला.या घटनेला पाच दिवस होऊन मात्र यातील ६८ आरोपी अद्यापही पसारच आहेत.तसेच पोलिस प्रशासन आरोपींना पाठीशी घालत आहे.
या घटनेच्या निषेधार्थ १२ डिसेंबर २०२३ रोजी नगर मनमाड राज्य महामार्गावर बाभळेश्वर येथे आरपीआय (आ) च्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रीपाई जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिली.
या घटनेतील आरोपीवर पोलिसांकडून पोस्को सारख्या कलमाची नोंद फिर्यादीमध्ये न घेणे,सदर कुटुंबावर बहिष्कार टाकणे, लाईट बंद करून दहशत निर्माण करणे, हा सर्व प्रकार गंभीर स्वरूपाचा असून केवळ अनुसूचित घटकातील कुटुंब असल्याने कोणाच्यातरी दबावामुळे या गंभीर गुन्ह्याची नोंद फिर्यादीमध्ये केलेली नाही.त्यामुळे आरपीआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली १२ डिसेंबर २०२३ रोजी राहता तालूक्यात नगर मनमाड राज्य महामार्गावर बाभळेश्वर चौक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
यातील पिडीत कोळगे कुटुंब उपस्थित राहणार असून पिडीत कुटुंबांना न्याय देण्यासाठी फुले, शाहू आंबेडकर चळवळीतील हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन रीपाई राहुरी तालूकाध्यक्ष विलासनाना साळवे यांनी केले.