नववर्षानिमित्त तसेच नाताळ सणानिमित्त युवा ख्रिस्ती आघाडी यांच्या वतीने अनाथ तसेच विधवा महिलांना साड्या वाटप
अहमदनगर (दि.१० डिसेंबर):-नववर्षानिमित्त तसेच नाताळ सणानिमित्त युवा ख्रिस्ती आघाडी अहमदनगर यांच्या वतीने अनाथ तसेच विधवा महिलांना साड्या वाटप करण्यात सुरवात केली असून क्राऊन ऑफ ग्लोरी चर्च अहमदनगर या चर्च पासून याची सुरुवात करण्यात आली.
यावेळी युवा ख्रिस्ती आघाडीचे संस्थापक ब्र.राहुल वैराळ म्हणाले की हा कार्यक्रम वर्षभर राबविण्यात येणार असून अनाथ व विधवा महिलांना युवा ख्रिस्ती आघाडी कडून योग्य ती मदतही कायम केली जाणार आहे.या वेळी युवा ख्रिस्ती आघाडीचे संस्थापक, अध्यक्ष ब्र.राहुल वैराळ,पा.अतुल जाधव,ब्र.गौरव घोरपडे,ब्र. अनिल वाघमारे,ब्र.शुभम गायकवाड,अनुग्रह वैराळ, आदी युवक उपस्थित होते.