
अहमदनगर (दि.१९ डिसेंबर):-अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथील एटीएम फोडत चोरट्यांनी लांबवले पावणे पाच लाखांची रक्कम….
तालुक्यातील तळेगाव दिघे येथे असणाऱ्या इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास फोडत तसेच एटीएम मध्ये असणारा सीसीटीव्ही कॅमेरा व एसी तसेच एटीएम मशीन जाळून टाकत एटीएममध्ये असणारे ४ लाख ८६ हजार ६०० रूपये अज्ञात चोरट्याने लंपास केले असल्याची घटना घडली आहे.
सदर घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा आढावा घेतला तर घटनास्थळी तपासकामी अहमदनगर येथील श्वान पथक व ठसा तज्ञ टीमला पाचारण करण्यात आले होते.
आत्तापर्यंत इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम तीनदा फोडण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. यावेळी संगमनेर पोलीस उपविभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे,संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे,पोहेकॉ/अमित महाजन,पोना/राजेंद्र पालवे, पोना/ओंकार शेंगाळ,यांसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.वारंवार एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांच्या तपास लावण्याचा पोलिसांसमोर आता मोठे आव्हान निर्माण झाले आहे.