Maharashtra247

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त सेनापती बापट विद्यालयात शेष पारितोषिक वितरण समारंभ संपन्न 

पारनेर (ॲड.प्रवीण तांबे):-अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या सेनापती बापट विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून शेष पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.संभाजीराव गायकवाड हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्यध्यापिका श्रीम.वैद्य मॅडम होत्या.कार्यक्रमास जेष्ठ शाळा समिती सदस्य श्री.गुळवे सर,अमित जाधव तसेच पर्यवेक्षक श्री.भांड सर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःला सोशल मिडियात गुंतवून न ठेवता आपले ध्येय डोळयासमोर ठेऊन चांगला अभ्यास करून यश संपादन करावे आणि आपले आई वडील शाळा यांचे नाव उज्ज्वल करावे असा आशावाद त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यातील येणाऱ्या अडचणींवर कशा प्रकारे मात करावी या विषयी पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.

समाजात असणाऱ्या वाईट प्रवृत्ती पासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे.समाजाने पोलीस बांधवाकडे सकारात्मक नजरेने पहावे असे त्यांनी सांगितले.पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम.वैद्य मॅडम यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. काकडे सर यांनी करून दिला.पारितोषिक प्राप्त विद्यार्थी यादी वाचन सौ.ठुबे मॅडम यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.रायसोनी मॅडम यांनी केले.आभार श्री. ढोकळे सर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे पदाधिकारी,शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page