
अहमदनगर (दि.१३ जानेवारी):-गुरु संत रविदास महाराजांचे समतावादी विचार समाजातील व तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी चर्मकार संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने काढण्यात आलेली संत शिरोमणी गुरु रविदास महाराज प्रेरणायात्रा उत्साहात पार पडली.

या यात्रेच्या माध्यमातून संत रविदास महाराजांच्या विचारांचा जागर करुन समाज समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा,पिळवणूक करणारे व समाजात जातीय द्वेष पसरविणाऱ्या विरोधात यात्रेच्या माध्यमातून जागृती करण्यात आली.
श्रीरामपूर येथून या यात्रेचे प्रारंभ झाले होते.या यात्रेचे अहमदनगर शहराच्या विविध ठिकाणाहून मार्गक्रमण होऊन चास,वाडेगव्हाण,शिरूर, रांजणगाव व भीमा कोरेगाव मार्गे कात्रज (जि.पुणे) येथील संत रविदास महाराज तिसरे धाम या ठिकाणी समारोप झाला.संत रविदास महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी या यात्रेच्या माध्यमातून समाज एकवटला होता. चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या यात्रेत जिल्हा संघटक दिलीपजी शेंडे, बापूसाहेब देवरे,महिला जिल्हाध्यक्षा मीनाताई गायकवाड,सुनंदा शेंडे, शहराध्यक्षा शशिकला झरेकर,राहता तालुकाध्यक्षा चंद्रकला गायकवाड, गोकुळदास साळवे,उपाध्यक्ष बाबासाहेब तेलोरे,अश्रूजी लोकरे,जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब केदारे,विठ्ठलराव जयकर,जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोहकरे,युवा प्रदेशाध्यक्ष सुभाष भागवत, युवाध्यक्ष अभिजीत खरात, सल्लागार कारभारी चिंधे, रामकिसन साळवे,अभिजीत शिंदे,नंदकुमार गायकवाड, सुभाष झरेकर,आप्पासाहेब केदारे सहभागी झाले होते.
शिवाजी साळवे म्हणाले की, सामाजिक एकात्मता, सलोखा,प्रबोधन,समाजसेवा व समाजोन्नतीच्या दृष्टीकोनाने संत शिरोमणी गुरु रविदास महाराज प्रेरणा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी-परंपरामुळे मानवी जीवनाचे मोठे नुकसान होत आहे.या विरोधात साधु-संतांनी व महापुरुषांनी समाजाला दिशा दिली. आजही ते विचार घेऊन पुढे गेल्यास समाजाचा विकास साधला जाणार आहे.हा वैचारिक वारसा घेऊन चर्मकार संघर्ष समिती पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले.चास येथील प्रविण केदारे यांनी प्रतिकूल परिस्थिती असूनही शेतात स्वखर्चाने उभारलेल्या रविदास महाराजांच्या मंदिराची समाज बांधवांनी पहाणी केली.वाडेगव्हाण येथे गोकुळदास साळवे यांच्यासह ग्रामस्थांनी रॅलीचे उत्साहात स्वागत केले.रॅलीतील समाज बांधवांनी भीमा कोरेगाव येथील शौर्य स्तंभाला अभिवादन केले.
कात्रज येथील संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या मंदिरात आल्यानंतर रविदासिया धर्म प्रसारक अध्यक्ष सुखदेव महाराज वाघमारे व अमोल महाराज वाघमारे यांनी या यात्रेचे स्वागत केले. या यात्रेच्या स्वागतासाठी पुणे येथील चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुखदेव महाराज वाघमारे व अमोल महाराज वाघमारे यांनी संत रविदास महाराजांच्या समतावादी विचारांवर प्रवचनपर मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.