गहू,तांदूळ,मका,साखर,हरभरा या जप्तीच्या मालाचा १७ जानेवारी रोजी येथे होणार लिलाव
अहमदनगर (दि.१६ जानेवारी):-तहसिलदार नगर या कार्यालयाच्या अधिनस्त जप्त मुद्देमाल गहू,तांदूळ,मका, साखर,हरभरा,मात्रा धान्य लिलाव शासकीय अन्नधान्य गोदाम (पाच गोडावुन) केडगाव ता.अहमदनगर येथे दि.१७ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ठीक २ वाजता करण्यात येत आहे.या लिलावात सहभागी होणे करीता अनामत रक्कम ५०००/-( पाच हजार) भरणे बंधनकारक राहील.
लिलावा बाबतच्या सर्व अटी व नियम लिलावाच्या दिवशी लिलावाच्या ठिकाणी पाहावयास मिळतील.तसेच लिलाव देण्याचा अथवा नाकारण्याचा पुर्ण अधिकार कार्यालयाने राखुन ठेवलेला आहे.सर्व नागरिकांना कळविणेत येते की,सदर लिलावात सहभाग घेणे करीता इच्छुक भुसार माल खरेदी विक्री वैधपरवानाधारक यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन नगर तहसिलदार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.