अहमदनगर (दि.१६ जानेवारी):-नागापूर ते शेंडी बायपास रोडवर दत्त कामानी समोर सोमवार दि.१५ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अमलदारांनी तपास करत बंटी उर्फ किरण प्रकाश पाटोळे व रोहित प्रकाश पाटोळे (दोघे रा.दूध डेअरी चौक) यांना अटक केली आहे.