पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शिर्डी येथे २ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन
अहमदनगर (दि.३० जानेवारी):-पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शिर्डी येथे जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन केलेले आहे.
हि बैठक शुक्रवार ता.२ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १२.०० वा.शिर्डी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेली असून पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे व महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रा.जयंत गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे.
तरी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते,भीमसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे वतीने उपस्थितीत राहावे असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी केले आहे.