भारतातील सर्व निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकाद्वारे घेण्यात याव्या बहुजन समाज पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन-बसपा महिला जिल्हाध्यक्ष संघमित्रा कस्तुरे
बुलढाणा प्रतिनिधी (दि.१ फेब्रुवारी):-लोकमताचा आदर करुन सर्व निवडणूका ई-व्हीएम ऐवजी मतपत्रिकेव्दारे मतदान घेण्यात यावे या मागणीसाठी बुलढाणा बहुजन समाज पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा यांच्या नेतृत्वाखाली ३१ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,लोकशाही मध्ये लोकांच्या म्हणण्याला व मागणीला अनन्य साधारण महत्त्व आहे.व मताधिकार हा प्रत्येक भारतीय नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे.त्यानुसार नागरिक योग्य त्या लोकप्रतिनिधीची निवड करतात.परंतृ ई व्हीएमव्दारे जी मत प्रक्रिया राबविली जाते,ती स्वतंत्र निःपक्ष व पारदर्शी नसल्याचे निःष्पन्न झाले आहे.त्यामध्ये खालील बाबींची स्पष्टता नसल्यामुळे व त्याबाबतची दखल निवडणूक आयोग गांभीर्याने घेत नसल्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक संशय, कल्लोळ निर्माण झाला आहे.
ई-व्हीएम व्दारे आम्ही दिलेले मत योग्य त्या व्यक्तीस मिळते किंवा नाही,अशी प्रत्येकार्ची धारणा झाली आहे.मतदाराने दिलेले मत त्याने पसंती दर्शविलेल्या उमेदवारास मिळाले नाही हे ई-व्हीएम व्दारे सिध्द करता येत नाही.व्हीव्हीपिंटमध्ये दिसणाऱ्या प्रतिमेच्या सर्व पावत्या मोजणी होत नसल्याने कोणत्या उमेदवाराला मतदान केले हे समजू शकत नाही.ई-व्हीएम मशिन एक मानव निर्मित यंत्र असल्यामुळे त्यात केंव्हाही तांत्रीक बिघाड होवू शकतो. त्यामध्ये संकलित झालेला डाटा हा नष्ट होवृन मतदान वाया जावू शकते.ई-व्हीएम मशिनने केलेल्या चूकीबाबत कोणत्याही न्यायालयात दाद मागता येत नाही कारण ते एक निर्जीव यंत्र आहे.
ई-व्हीएम मानव निर्मित असल्याने त्या ई-व्हीएमचा निर्माता अथवा संबंधीत यंत्रणा तिला नियंत्रीत करु शकतो व पाहिजे तसा डाटा मध्ये बदल करु शकतो.भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे. त्यामुळे जनतेचे हक्क व अधिकार विचारात घेवून लोकांच्या मागणीला गांभीर्याने घेवृूनई-व्हीएम ऐवजी मत पत्रिकेव्दारे मतदान घेणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे.असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.निवेदन देता समयी बहजन समाज पार्टी महिला आघाडी बुलढाणा जिल्हाध्यक्षा संघमित्रा कस्तूरे व पार्टीच्या महिला सदस्या उपस्थित होत्या.