अहमदनगर (दि.१ फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील ॲड.राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी ॲड.मनीषा राजाराम आढाव या वकील दाम्पत्यांचे २५ जानेवारी २०२४ रोजी अपहरण करुन त्यांचा निर्घृण खून करण्यात आला होता.
या घटनेने जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली होती.या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४ तर राहुरी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी १ अशा एकूण पाच आरोपींना अटक केले आहे.
या हत्येच्या घटनेचा तपास अखेर राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे देण्यात आला आहे.असे निर्देश मुंबई येथील विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी पारीत केलेल्या आदेश पत्रात नमूद केले आहेत.