अहमदनगर (दि.१ फेब्रुवारी):-सहा लाख 30 हजार रुपये किंमतीच्या ७ चोरीच्या महागड्या मोटार सायकलसह ३ आरोपींना जेरबंद करण्यात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
बातमीची हकीगत अशी की, जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.दिलेल्या आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर,यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीचे गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेवुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत आवश्यक सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.
पथक नगर शहर परिसरात फिरुन मोटार सायकल चोरी करणारे आरोपींची माहिती घेत असताना दि.३० जानेवारी रोजी पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,इसम नामे राहुल निकल हा साथीदारासह देहरे येथून विळदघाट बायपास येथे चोरी केलेली विना नंबर लाल रंगाची पॅशन प्लस मोटार सायकल विक्री करणे करीता येणार आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन, पंचाना सोबत घेवुन,खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविले.
पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन सापळा लावुन थांबलेले असताना दोन संशयीत इसम विना नंबर लाल रंगाचे मोटार सायकलवर येताना दिसले.पथकाची खात्री होताच त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.संशयीतास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1)राहुल विजय निकम व 2)बंडु सुदाम बर्डे असे असल्याचे सांगितले.त्यास ताब्यातील मोटार सायकल व त्याचे कागदपत्रा बाबत विचारपुस करता सुरुवातीस तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला.त्यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी दुधडेअरी चौक,एमआयडीसी येथून सदर मोटार सायकल चोरी केली असुन विक्री करणे करीता आणली असल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी साथीदार नामे 3) अरुण बाळासाहेब धिरोडे याचे सोबत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, एमआयडीसी,निंबळक येथुन ४ व पुणे जिल्ह्यातील शिरुर व आळेफाटा येथुन ३ अशा विविध ठिकाणाहुन एकुण ७ चोरी केलेल्या मोटार सायकल पैकी तिन मोटार सायकल या त्याचे कडे व तिन मोटार सायकल या साथीदार बंडु बर्डे व एक मोटार सायकल ही साथीदार अरुण धिरोडे याचे कडे असल्याचे सांगितले.
पथकास दोन्ही आरोपींकडे विविध कंपनीच्या ६ मोटार सायकल मिळुन आल्या व आरोपी नामे अरुण धिरोडे याचा बेलापुर ता.श्रीरामपूर परिसरात शोध घेता तो मिळुन आल्याने त्यास चोरीची एक मोटार सायकलसह ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपींना मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलिस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व श्री. संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामिण व श्री. सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी,संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव, पोहेकॉ/मनोहर गोसावी, संदीप पवार,रविंद्र कर्डीले, देवेंद्र शेलार,विशाल गवांदे, पोना/भिमराज खर्से,फुरकान शेख,पोकॉ/सागर ससाणे, रणजित जाधव,अमृत आढाव,प्रशांत राठोड व चापोहेकॉ/संभाजी कोतकर यांनी केलेली आहे.