
चिखली प्रतिनिधी:-रेल्वे लोक आंदोलन समितीतर्फे चिखली तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा २५ वा दिवस होता.

खामगांव जालना रेल्वेमार्ग तात्काळ सुरू करावा व रेल्वेमार्गाला ५० टक्के राज्य हिस्सा त्वरित द्या अशी आग्रही मागणी करत आंदोलन करण्यात आले.या समितीला समर्थन म्हणून सर्व राजकीय पक्ष,सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते तथा समस्त चिखली वासियांनी महामोर्चाचे आयोजन केले होते.या मोर्चाला स्थानिक लोकांचा ही खूप मोठा पाठिंबा होता.
त्यातच आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सकाळी ११ वाजता या मोर्चास प्रारंभ झाला तसेच या मोर्चामध्ये खामगाव जालना रेल्वे मार्गाची मागणी करणाऱ्या टोप्या फलक आणि झेंडे घेऊन नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बहुजन समाज पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा संघमित्रा कस्तुरे यांनी या मोर्चात सहभाग नोंदवून आपले मत वक्त केले.यापुर्वी सुद्धा समितीच्या धरणे आंदोलनाला तहसील कार्यालय चिखली यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन बहुजन समाज पार्टी बुलडाणा महिला जिल्हाध्यक्षा कस्तुरे यांनी जाहीर पाठींबा दिला होता
एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची बुलढाणा जिल्ह्यामध्ये चांगली पकड आहे गोरगरीब लोकांच्या समस्या सोडवणे राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त भर देणे हा त्यांचा मुख्य हेतू आहे.आजच्या आंदोलनाला बसपा पक्षाच्या वतीने पाठिंबा देऊन कस्तुरे त्यांनीही खामगाव जालना रेल्वे मार्गाला ५० टक्के राज्य सत्वरी द्या अशी आग्रही मागणी केली .