
अहमदनगर (दि.५ फेब्रुवारी):-एमआयडीसी परीसरातुन अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो चोरी करणारा आरोपीस ५ लाख १०,००० हजार रु.किंमतीच्या अशोक लेलंड कंपनीचा टेम्पोसह एमआयडीसी पोलीसांनी जेरबंद केले आहे.
बातमीची हकीकत अशी की,दि.०४ फेब्रुवारी रोजी यातील फिर्यादी विक्रम पंढरीनाथ उगलमुगले (रा.जोहरापुर ता.शेवगाव जि. अ.नगर) यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली कि,एचपी पेट्रोलपंप गरवारे चौक नवनागापुर एमआयडीसी येथुन त्यांचा अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो कोणीतरी अज्ञात चोरटयाने स्वतचे आर्थिक फायद्याकरीता लबाडीच्या इरादयाने चोरुन नेला आहे.
मजकुरावरुन गुन्हा रजि नं.११२/२०२४ दाखल करण्यात आला होता.या गुन्हयाचा समांतर तपास करत असताना एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सपोनि माणिक चौधरी यांना गोपनीय बातमी मिळाली कि गुन्हा हा अमर सोमनाथ शिरसाळ (रा. दांगटमळा,नवनागापुर ता.जि. अहमदनगर) याने केला आहे.या माहितीवरुन सपोनी/चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन आरोपी यास सापळा लावुन बोल्हेगाव येथुन पकडले.या गुन्हयाबाबत त्यास विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबुलकेले.
त्याच्या कडून गुन्हयातील चोरी गेलेला ५ लाख १०,००० रु.किंमतीचा अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो जप्त केला आहे.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग श्री.संपतराव भोसले यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/ माणिक चौधरी यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ/नंदकुमार सांगळे,पोहेकॉ/राजु सुद्रीक, पोहेकॉ/साबीर शेख,पोना/ विष्णु भागवत,पोना/महेश बोरुडे,पोकॉ/किशोर जाधव, पोकॉ/नवनाथ दहिफळे, मोबाईल सेलचे पोकॉ/ राहुल गुंडू यांनी केली आहे.