
अहमदनगर (दि.१८ फेब्रुवारी):-सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या मानव सेवा ट्रस्टच्या अहमदनगर महिला जिल्हा उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या अश्विनीताई झरेकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
अहमदनगर शहरातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये आपल्या समाजकार्याने परिचित असलेल्या सौ.अश्विनीताई झरेकर यांना मिळालेल्या नियुक्तीने महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा बसणार आहे.त्या एक निडर सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे.
मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गजानन इंगळे,संस्थापक सचिव अरुण पांडव,संस्थापक कोषाध्यक्ष संगीताताई साबणकर, संस्थापक सहसचिव गोविंद अग्रवाल,यांच्या आदेशाने तसेच महाराष्ट्र अध्यक्ष वसंत घायाळ,महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष प्रदीप कोल्हे,महाराष्ट्र सचिव प्रकाश तांबडे,महाराष्ट्र कोषाध्यक्ष चक्रपाणि चाचर, महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजेंद्र गिरी,महाराष्ट्र सहकार्याध्यक्ष किशोर छल्लारे,महाराष्ट्र प्रमुख राजेश कुमार ठाकूर,प.महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख रितेश नन्नवरे, महाराष्ट्र महिला अध्यक्ष ज्योतीताई बावस्कर,महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष राणीताई पवार,महाराष्ट्र महिला सल्लागार राणीताई पवार, महाराष्ट्र महिला सल्लागार ॲड.पूजाताई खरात,पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा ॲड. नीताताई फडतरे यांच्या सूचनेनुसार निवड करण्यात आली आहे.सौ.अश्विनीताई झरेकर यांची नूतन महिला जिल्हाउपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने महिला वर्गामध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.