
अहमदनगर (दि.१८ फेब्रुवारी):-तिरट जुगार खेळणा-या इसमांवर भिंगार कॅम्प पोलीसांनी छापा टाकून ६३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हि कारवाई सपोनि/योगेश राजगुरू यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भिंगार कॅम्प पोलिसांनी भिंगार शहरातील पाटील गल्ली येथील हरबा वाड्यात १७ फेब्रुवारी रोजी करण्यात आली.प्रवीण सुनिल पेंडूलकर,आकाश अरुण थोरात,तेजस रघुनाथ पाडळे,शिवा राजु सदलापुरकर,अविनाश कुमार व-हाड़े सर्व रा.भिंगार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
हि कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खेरे,श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/ योगेश राजगुरु यांच्या सूचनेनुसार पोसई/किरण साळुंखे व तपास पथकातील पोलीस अंमलदार संदिप घोडके,दिपक शिंदे,समीर शेख,अमोल आव्हाड,संदिप थोरात,कैलास शिरसाठ यांनी केली आहे.