
अहमदनगर (दि.२६ फेब्रुवारी):-राज्य उत्पादन शुल्क विभागाचे महाराष्ट्रा राज्याचे आयुक्त डॉ.श्री.विजय सुर्यवंशी यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यात हातभटटी दारु विरुध्द सुरु केलेली हातभटटीमुक्त गांव मोहिम अधिक परिणामकारक करण्यांबाबत उत्पादन शुल्क विभागाला सूचना केल्या होत्या.
दिलेल्या सूचनेनुसार अहमदनगर जिल्ह्यात दि.२४ व २५ फेब्रुवारी या दोन दिवसात हातभट्टी गावठी दारू निर्मिती व विक्री विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आलेली होती.या मोहिमेत नगर तालुक्यातील खंडाळा,नेप्ती,खातगाव टाकळी येथे तर श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी शिवार ढालवाडी शिवार श्रीगोंदा कारखाना,श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी, टाकळीभान,देवळाली प्रवरा, मनाई शिवार,कनगर,सोने सांगवी,येथेही उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली.
या कारवाईत २८ जणांना अटक केली असून १० लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.हि कारवाई महाराष्ट्र राज्याचे आयुक्त डॉ.श्री.विजय सुर्यवंशी यांच्या सूचनेनुसार श्री.प्रसाद सुर्वे संचालक (अं व द), राज्य उत्पादन शुल्क,महाराष्ट्र राज्य, मुंबई,श्री.सागर धोमकर, विभागीय उपआयुक्त,राज्य उत्पादन शुल्क,पुणे विभाग, तसेच श्री.प्रमोद सोनोने,अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,अहमदनगर श्री.प्रवीणकूमार तेली, परि.उपअधीक्षक राज्यउत्पादन शुल्क अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचे सर्व कार्यकारी निरीक्षक,दुय्यम निरीक्षक, तसेच भरारी पथक क्र.१ व ३ तसेच अकार्यकारी घटकाचे निरीक्षक/दुय्यम निरीक्षक, जवान कर्मचारी यांनी केली आहे.
परि.उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर प्रवीणकुमार तेली यांनी जनतेस केले हे आवाहन
आवाहन करण्यात येते की,आपल्या परिसरात अवैध मद्यविक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास विभागाचे खालील नमुद क्रमांकावर तक्रार करावी.जेणे करुन अवैध मद्यविक्री/ निर्मिती व वाहतुक इ.परिणामकारक कारवाई होऊन त्याचे समूळ उच्चाटन होण्यास जनतेद्बारे मदत होईल.
टोल फ्री क्र:-१८००२३३९९९९
व्हाट्सअप क्रमांक:-८४२२००११३३
दूरध्वनी क्रमांक:-०२४१२४७०८६०