
अहमदनगर (दि.२६ फेब्रुवारी):-दि.४ फेब्रुवारी रोजी तक्रारदार सौ.शोभा सतिश मंडलेचा (रा.स्पाईन रोड,आळंदी,ता.हवेली, जिल्हा-पुणे) ह्या त्यांचे पती श्री.सतिश मंडलेचा यांचे सोबत त्यांचे नातेवाईक यांचे लग्न सोहळ्याकरिता बडी साजन मंगल कायर्यालय, अहमदनगर येथे आल्या होत्या.लग्न समारंभ उरकल्यानंतर त्या त्यांचे पती यांचे सह पुणे बस स्थानकावर आल्या.धुळे ते पुणे जाणा-या बसने पुण्याकडे जाण्याकरिता बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवुन अज्ञात चोरट्याने त्यांचे डाव्या हातातील अंदाजे 2 तोळे वजनाची सोन्याची एक पाटली चोरी केली होती.
तक्रारदार यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं. 134/2024 भादंवि क. 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास पो.निरी.प्रताप दराडे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/शाहीद शेख हे करित होते.बस स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रीक विश्लेषन करण्यात येवुन संशयीत इसमांची माहीती घेण्यात आली.गुन्ह्याचा तपास चालु असताना पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक बातमी मिळाली की,गुन्ह्यातील आरोपी हा अंबरनाथ,जिल्हा-ठाणे येथील रहाणारा असुन तो चोरी केल्या नंतर त्यांचे गावी गेलेला आहे.
पो.निरी.दराडे यांनी तात्काळ मिळालेल्या माहीतीबाबत तपासी अंमलदार पोहेकॉ/शेख यांना माहीती देवुन टीम सह आरोपीचा शोध घेणेकामी पोलीस स्टाफसह अंबरनाथ, जिल्हा-ठाणे येथे रवाना केले. पोहेकॉ/शाहीद शेख यांनी अंबरनाथ पोलीस स्टेशनचे स्थानिक पोलीस अंमलदार यांचे मदतीने गुन्ह्यातील संशयीत आरोपीचा अंबरनाथ शहरात शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्यांचे नाव अभिषेक चंदन गागडे (रा.फातिमा चर्च पाठीमागे,वाद्रापाडा, अंबरनाथ वेस्ट,ता.अंबरनाथ, जिल्हा- ठाणे) असे असल्याचे सांगितले.त्यास विश्वासात घेवुन गुन्ह्याचे अनुशंगाने तपास केला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली परंतु मुद्देमालाबाबत माहीती देण्यास टाळाटाळ केली.
नमुद आरोपीतास तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे आणून अटक करण्यात आली.आरोपी पोलीस अटकेत असताना अटक आरोपीचा नातेवाईक अमन सुरज गागडे,रा.अंबरनाथ, जिल्हा-ठाणे यांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर होवुन गुन्ह्यातील आरोपीने चोरी केलेले 20 ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली ही सोन्याचे लगड स्वरुपात पंचासमक्ष हजर केल्याने ती गुन्ह्याचे तपासात जप्त करण्यात आली आहे.हि कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/प्रताप दराडे, सपोनिरी/योगीता कोकाटे, पोउपनिरी/प्रविण पाटील, पोहेकॉ/तनवीर शेख,शाहीद शेख,पोना/अविनाश वाकचौरे,महिला पोलीस नाईक संगीता बडे,पोकॉ/ दिपक रोहोकले,सत्यजित शिंदे,तानाजी पवार,प्रमोद लहारे,अतुल काजळे,सुरज कदम,सोमनाथ केकान, शिवाजी मोरे,महेश पवार, अभय कदम,अमोल गाडे, याकुब सय्यद,मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडु यांनी केली आहे.