संगमनेर मध्ये सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळ्याचे आयोजन;केंद्रीयमंत्री ना.रामदास आठवले व महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील राहणार उपस्थित
संगमनेर (नितीन भालेराव):-५ मार्च रोजी संगमनेर येथील बस स्थानका समोर आरपीआयच्या वतीने सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळ्याची आयोजन करण्यात आले आहे.सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळा केदींय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले व महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तसेच लोकगायिका कडूबाई खरात यांच्या क्रांतीकारी भीमगितांचा कार्यक्रम मंगळवार दि ५ मार्च २०२४ रोजी सायं ५.३० वा. संगमनेर बस स्थानक परिसर होणार आहे. सामाजिक सलोखा परिषदेची जोरदार तयारी आरपीआयने केली आहे.संगमनेर अकोले तालुक्यासह जिल्हाभारातून कार्यकर्ते,पदाधिकारी,राजकीय,सामाजिक,कला क्षेत्रातील मान्यवरांच्या उस्थितीत सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.
राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव हे नगर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी कार्याक्रमाच्या पूर्व तयारीची माहिती तालुका पदाधिकार्यांना कडून घेतली. तर सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे उपस्थिती राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष आशिष शेळके,शहराध्यक्ष कैलास कासार, तालुका कार्याध्यक्ष विजय खरात,युवक तालुकाध्यक्ष योगेश मुन्तोडे सह संगमनेर तालुका आरपीआय च्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.