अहमदनगर (दि.३ मार्च):-गुजरात राज्यातुन पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी जाणारी सुगधीत तंबाखुचा टेम्पो नगर शहरातील उपनगर मधील सावेडी नाका येथे जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेश दिले होते.
दिलेल्या आदेशा प्रमाणे पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना अवैध धंद्यांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले.स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पथक २ मार्च रोजी नगर शहरामध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पोनि/श्री.आहेर यांना गुप्त बातमीदारा मार्फत इसम नामे अशोक बाबासाहेब जावळे (रा.बीड) हा त्याचे ताब्यातील पांढरे रंगाचे टेम्पोमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेली व शरिरास अपायकारक होईल असा खाद्य पदार्थ सुगंधीत तंबाखु ही गुजरात राज्यातुन पुणे या ठिकाणी विक्रीसाठी घेवुन जात असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली.
बातमीची हकीगत पोनि.आहेर यांनी पथकास कळवुन सुगंधीत तंबाखुची वाहतुक करणारे टेम्पोवर कारवाई करणेबाबत बाबत आदेश दिले.पथक अहमदनगर ते मनमाड जाणारे रोडवर सावेडी नाका या ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबले असता त्यांना बातमीतील वाहन येतांना दिसल्याने सदर वाहन चालकास थांबवून टेम्पोमधील मालाची खात्री केली असता टेम्पोमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेली व शरिरास अपायकारक होईल असा खाद्य पदार्थ सुगंधीत तंबाखु मिळन आली.टेम्पो चालकास त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव अशोक बाबासाहेब जावळे (रा.जवळाला,ता. पाटोदा,जि.) बीड असे असल्याचे सांगितले.
मिळुन आलेल्या तंबाखु बाबत टेम्पोचालकास अधिक विचारपुस केली असता त्याने सदरची सुगंधीत तंबाखु ही सुरेंद्र प्रसाद रा.सेक्टर ६३, नोएडा,दिल्ली,वसिम शेख रा. अहमदाबाद,गुजरात,चिराग ट्रान्सपोर्ट गुजरात,यांनी टेम्पोमध्ये भरुन देवुन ती विक्रीकरीता पुणे या ठिकाणी पाठविले असल्याचे सांगितले.ताब्यात घेण्यात आलेल्या टेम्पोमध्ये ८ लाख ३०,०००/- रुपये किमतीची ८३० किलो सुगंधीत तंबाखु तसेच ८,০०,০০০/- रुपये किमतीचा टेम्पो असा एकुण १६ लाख ३०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोकॉ/ २६०० रोहित मधुकर मिसाळ नेम स्थानिक गुन्हे शाखा,यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २८९/२०२४ भादवि कलम ३२८,१८८,२७२,२७३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
हि कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार संतोष लोढे, सचिन अडबल,संतोष खैरे,फुरकान शेख,रोहित मिसाळ,शिवाजी ढाकणे,प्रशांत राटोड यांनी केली आहे.