राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अहमदनगर मध्ये;शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याची केली पाहणी व अधिकाऱ्यांशी केली चर्चा..!
अहमदनगर (दि.११ मार्च):-राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक निखिल गुप्ता हे वार्षिक तपासणीसाठी अहमदनगर नगरमध्ये दाखल झाले आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी त्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वागत केले.
त्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक गुप्ता यांनी एसपी राकेश ओला यांच्या समवेत कोतवाली पोलीस ठाण्याची पाहणी केली.कोतवाली पोलीस ठाण्याची नवीन आणि प्रशस्त इमारत पाहून समाधान व्यक्त केलं.त्यांनी आजच्या भेटीत एडीजी गुप्ता यांनी कोतवाली पोलीस ठाण्यातल्या काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पाहणी केली.
तसंच काही गुन्ह्यांची या भेटीत माहिती घेतली.यावेळी त्यांच्या समवेत जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.यावेळी शहरातील रस्त्यांवरती ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा होता.