
अहमदनगर (दि.१४ मार्च):-नगर शहरातील मूलभूत सोयी सुविधा विकासकामांसाठी राज्य शासनाने नव्याने ८५ कोटी रुपयांचा तसेच भिंगार शहरातील मूलभूत सोयी सुविधा विकास कामांसाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
आ.संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निधीला मंजूरी दिली आहे.त्यामुळे नगर शहरासह भिंगरला आ.जगताप यांच्या माध्यमातून विकास कामाचे मोठे गिफ्ट मिळाले आहे.या निधीमुळे अनेक रस्त्यांचे भाग्य उजळणार असून नवीन उद्याने,क्रीडांगणे,चौक शूशोभीकरण तसेच अन्य विकासकामे होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या विश्वासू आमदाराला भरीव विकास निधी देऊन नगर शहराच्या विकासाची नव्याने पायाभरणी केली आहे.शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम आ.संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सुरु आहे.विकासकामे करताना सर्वात मोठी अडचण निधीची असते.आ.संग्राम जगताप यांनी गेल्या काही काळात वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून नगर शहरासाठी इतिहासातील सर्वात मोठा निशी खेचून आणला आहे.
राज्याच्या तिजोरीच्या चाव्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकड़े आहेत,त्यामळे आ. जगताप यांच्या मागणीला तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्र्यांनी निधी मंजूर केला आहे.नगर शहरातील डीपी रस्यांसाठी नुकताच पहिल्या टप्यातील १५० कोटींचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. त्यापाठोपाठ आता नगर शहरासाठी ८५ कोटीचा निधी मंजूर झाला आहे.त्यामुळे नगर शहरात येत्या काळत जवळपास २३५ कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागणार आहेत,आ.जगताप यांनी भिंगार शहराच्या विकासाचा शब्दही खरा करून दाखविला आहे. भिंगारसाठी प्रथमच राज्य शासनाकडन तब्बल ९ कोटींचा भरीव निधी मिळाला आहे.त्यामुळे भिंगारचाही कायापालट होण्यास मदत होणार आहे.
आ.जगतापांचा राजकीय निर्णय नगरसाठी लाभदायी
राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्पानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाली.त्यावेळी आ.संग्राम जगताप यांनी सूरुवातीपासूनच अजित पवारांची साथ देण्याचा राजकीय निर्णय घेतला त्यांनी घेतलेला निर्णय नगरसाठी लाभकारक ठरला आहे. पवारांनी आ.जगताप याच्या प्रस्तावानुसार नगर शहराच्या विकासासाठी निधी देताना हात सैल सोड़ले आहेत.त्यामुळे शहराच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे.भिंगार शहर छावणी परिषदेकडे असल्याने कोणताही प्रश्न सोडविण्यासाठी खूप का्याकूट करावी लागते. विकास करताना विविध परवानग्या मिळवताना थेट दिल्लीपर्यत विषय जातो. अशावेळी भिंगारमध्ये काम करताना प्रचंड मेहनत करावी लागते.मी भिंगारकरांना शब्द दिलेला असल्याने तो पाळण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.आमदार निधीतृून भिंगारमध्येअनेक विकासकामे केली.आता भिंगारला प्रथमच राज्य शासनाकडून इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. त्यामुळे भिंगारचाही चेहरामोहरा येत्या काळात बदललेला दिसेल,असा विश्वास आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.यावेळी राष्ट्रवादीतील नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत सांगितले की आम्ही २५ ते ३० वर्षापासून नगरसेवक आहोत परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात नगर शहराला निधी आत्तापर्यंत आला नाही तो आ.संग्राम जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्याने आला आहे.यामुळे नगरकरांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.यावेळी मा.उपमहापौर गणेश भोसले,मा.नगरसेवक संजय चोपडा,मा.नगरसेवक विजय गव्हाळे,राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष मा.नगरसेवक संपत बारस्कर,मा.नगरसेवक निखिल वारे,मा.नगरसेवक प्रकाश भागानगरे,मा. नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, मा.नगरसेवक अविनाश घुले,मा.नगरसेवक अजिंक्य बोरकर,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर,सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद कुरेशी,व भिंगार शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.