
अहमदनगर (दि.१६ मार्च):-अहमदनगर शहरातील महानगरपालिका हद्दीतील रहिवासी,व्यावसायिक व इतर सर्व मालमत्ता धारकांना महानगरपालिकेतर्फे नम्र आवाहन करण्यात आले आहे की शहरातील नागरीकांचे निवेदने,वेळोवेळी करण्यात आलेली शास्ती माफीची मागणी विचारात घेवून महानगरपालिकेने दि.१६ मार्च २०२४ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीमध्ये मालमत्ता करातील शास्तीमध्ये ७५% माफी देण्याचा घेतलेला आहे.
तरी या निर्णयाचा लाभ घेवून आपला कर वेळेमध्ये भरावा.सर्व मालमत्ता धारकांना सुचित करण्यात येते की,शास्ती माफी बाबतची ही अंतिम संधी असून यामध्ये कराचा भरणा न करणा-यांवर त्यानंतर कठोर कारवाई करण्यात येईल असे महानगरपालिकेतर्फे म्हटले आहे.