
प्रतिनिधी (दि.१६ मार्च):-१६ जून २०२४ रोजी लोकसभेचा कार्यकाळ संपणार आहे.त्या अनुशंघाने लोकसभेच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या.निवडणूक आयोगाची (दि.१६ मार्च) रोजी पत्रकार परिषद पार पडली.यामध्ये आजपासून म्हणजेच १६ मार्च पासून आचार संहिता लागू करण्याची घोषणा करण्यात आली.
तसेच निवडणुकांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या.लोकसभेच्या निवडणुका एकूण ७ टप्यात होणार आहे.१९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.४ जूनला निकाल लागेल.महाराष्ट्रासाठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे.
असे असतील निवडणुकांचे टप्पे
१९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान
२६ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान
७ मे रोजी होणार तिसऱ्या टप्प्यातील मतदान
१३ मे रोजी होणार चौथ्या टप्प्यातील मतदान
२० मे रोजी होणार पाचव्या टप्प्यातील मतदान
२५ मे ला होणार सहाव्या टप्प्यातील मतदान
१ जूनला होणार सातव्या टप्प्यातील मतदान
असे असेल मतदान..
पहिला टप्पा दि.१९ एप्रिल:-रामटेक,नागपूर, भंडारा-गोंदीया,गडचिरोली,चिमूर,चंद्रपूर,
दुसरा टप्पा दि.२६ एप्रिल:- बुलडाणा,अकोला, अमरावती,वर्धा,यवतमाळ,वाशिम,हिंगोली,नांदेड,परभणी
तिसरा टप्पा,दि.७ मे:- रायगड, बारामती,धाराशीव,लातूर, सोलापूर,माढा,सांगली,सातारा,रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर,हातकणंगले
चौथा टप्पा दि.१३ मे:- नंदूरबार,जळगाव,रावेर,जालना, छत्रपती संभाजीनगर,मावळ,पुणे,शिरुर,अहमदनगर, शिर्डी,बीड
पाचवा टप्पा दि.२० मे:- धुळे,दिंडोरी,नाशिक,पालघर, भिवंडी,कल्याण,ठाणे,मुंबईतील सहा मतदारसंघ