
अहमदनगर (दि.१६ मार्च):-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात १६ मार्चपासून आचारसंहिता लागू झाली आहे.तसेच निवडणुकीचे कामकाजही सुरू झाले असून अहमदनगर जिल्ह्यामध्ये ३७ अहमदनगर व ३८ शिर्डी असे दोन मतदारसंघ आहेत.
या दोन्ही मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुका दरम्यान आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आचारसंहिता कक्ष वार रूम पाचवा मजला दि.१६ मार्च २०२४ पासून स्थापन करण्यात आलेला आहे. त्याचा संपर्क क्रमांक ०२४१-२३४१९५५ असा आहे तरी कृपया नागरिकांनी आचारसंहिता अंमलबजावणी बाबतच्या काही तक्रारी असल्यास या कक्षाकडे दाखल कराव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे.