
अहमदनगर (दि.१६ मार्च):-भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना महा.पोलीस कायदा कलम 56 (1) (अ) (ब) अन्वये अहमदनगर जिल्ह्याच्या स्थळ सीमेच्या हद्दीतुन हद्दपार करणे बाबतचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयामार्फत उपविभागीय दंडाधिकारी अहमदनगर यांना पाठविण्यात आले होते.
यामध्ये इसम नामे विजय आसाराम रासकर (रा.चौधरी नगर,सारसनगर) यांचे हद्दपार मंजुर झाले बाबतचे आदेश पोलीस स्टेशनला प्राप्त झाले. कॅम्प पोलीस स्टेशन सहा. पोलीस निरीक्षक श्री.योगेश राजगुरु यांचे आदेशान्वये नमुद हद्दपार इसमास पोलीस स्टेशनला आणण्यात आले.व त्याची कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन त्यांना अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीबाहेर पोलीस अंमलदार यांनी रवाना केले.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांचे सूचनेनुसार पोसई/बोरसे, सफौ/कैलास सोनार,पोहेकॉ/ दीपक शिंदे,पोहेकॉ/संदीप घोडके,पोकॉ/कैलास शिरसाठ,पोकॉ/देवा थोरात, पोकॉ/अमोल आव्हाड यांनी केली आहे.