
माढा प्रतिनिधी:-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा व सांगली या मतदारसंघातील उमेदवारांसाठी निवडून आणण्यासाठी कोण कोणते विविध कार्यक्रम राबवायचे यासंदर्भात आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली झूम मीटिंग पार पडली.
या झूम मिटींगला ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्या माया माने उपस्थित होत्या.अबकी बार ४०० पार ही संकल्पना घेऊन प्रत्येक मतदारसंघातून भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार निवडून आलेच पाहिजे व त्यांच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी दिवस रात्र करून कामाला लागले पाहिजे असे मत यावेळी बावनकुळे यांनी व्यक्त केले.
यावेळी ओबीसी मोर्चा प्रदेशच्या सदस्या माया माने यांनी माढा मतदारसंघातील भाजपाचा उमेदवार हा जास्तीत जास्त मतांनी निवडून येईल त्यासाठी सर्व कार्यकर्ते दिवस-रात्र एक करू असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मीटिंगद्वारे दिला.