
अहमदनगर (दि.१५ एप्रिल):-ट्रक चालकास लुटून मारहाण करणाऱ्या आरोपींना भिंगार कॅम्प पोलिसांना अवघे बारा तासाच्या आतच जेरबंद करण्यात मोठे यश आले आहे.
बातमीची हकीकत आशिकी,यातील फिर्यादी बबलू विश्वनाथ जाधव हे त्यांच्या मालट्रक मध्ये एवरेशीट कंपनीचा सिमेंटचा सूट माल नाशिक येथून भरून नगर शहरात आले असता शहरातील डीएसपी चौकाजवळील पाण्याच्या टाकीजवळ एका काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारने ट्रकला गाडी आडवी लावून स्विफ्ट गाडीतील तरुणांनी ट्रक ड्रायव्हरला लाथा बुक्क्यांनी मारून जखमी करून त्याच्या कडून २१ हजार ५०० रू.रोख रक्कम बळजबरीने काढून नेली होती.
या बाबत ट्रक ड्रायव्हरच्या जबाबावरून कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास करताना कॅम्प पोलिस ठाण्याच्या गुन्हे पथकाने सपोनि/योगेश राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा शोध घेऊन वेगवेगळ्या ठिकाणावरून १२ तासांच्या आत आरोपींना अटक करून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार जप्त केली आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके करत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनी/योगेश राजगुरू यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार रेवननाथ दहिफळे,कैलास सोनार,संदीप घोडके,रामनाथ डोळे,दीपक शिंदे,रवींद्र टकले,संदीप थोरात,समीर शेख,कैलास शिरसाट,अमोल आव्हाड यांनी केली आहे.