Maharashtra247

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तरुणाकडे गावठी कट्टा कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड

अहमदनगर (दि.२० एप्रिल):-आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री दिनेश आहेर यांना अहमदनगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.दिलेल्या आदेशाप्रमाणे पोनि श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे,रविंद्र कर्डीले, सचिन अडबल,संतोष खैरे,रणजित जाधव यांचे एक पथक तयार करुन अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास मार्गदर्शन करुन पथक रवाना केले. होते.

पोलीस पथक नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये अग्निशस्त्र, हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी कळली की,इसम नामे सुरेश दत्तात्रय कोकाटे (रा.तळेवाडी,चिचोंडी पाटील,ता.जि. अहमदनगर) हा विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी कट्टा (अग्निशस्त्र) त्याचे कब्जात बाळगुन असुन तो आत्ता त्याचे राहते घरी असल्याची माहिती मिळाली.पथकाने चिचोंडी पाटील गावामध्ये जावुन बातमीतील नमुद इसमाचे घरी जावुन खात्री करता सदर घरासमोर एक इसम मिळुन आला.त्यास ताब्यात घेतले.ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाची अंगझडती घेतली असता त्याचे डावे कमरेस खोचलेले 30,000/-रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) व पिस्टलचे मॅग्झिनमध्ये 2000/- रुपये किमतीचे 02 जिवंत काडतुसे असा एकुण 32,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला.

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमा विरुध्द पोकॉ/2514 रणजित पोपट जाधव नेम स्थानिक गुन्हे शाखा यांचे फिर्यादीवरुन नगर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 412/2024 आर्म ऍ़क्ट कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास नगर तालुका पोलीस ठाणे करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

You cannot copy content of this page