
अहमदनगर (दि.२३ एप्रिल):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशाने अहमदनगर दक्षिण मधील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना पक्षाच्या अहमदनगर येथील कार्यकर्त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. निलेश लंके यांचे समाजकार्य व जनतेबाबत असलेली तळमळ पाहून पक्षाने पाठिंब्याचा निर्णय घेतला असे शहराध्यक्ष संदीप वाघमारे यांनी सांगितले.
या वेळी उमेदवार निलेश लंके यांना तसे पत्र देण्यात आले.यावेळी युवक शहराध्यक्ष संदीप वाघमारे,नगर शहराध्यक्ष हरीश आल्हाट,शहर उपाध्यक्ष दिनेश पंडित,निलेश भाऊ साळवे,आशिष राठोड, संदीप घोरपडे,विशाल परदेशी,सचिन शेलार, अमोल रणसिंग,तमाम आंबेडकर चळवतील भीमसैनिक यावेळी उपस्थित होते.