
अहमदनगर (दि.२४ एप्रिल):-क्रेडिट कार्ड ऍक्टिव्हेट करण्यासाठी फोन येऊन कस्टमर सपोर्ट ॲप्लीकेशन डाऊनलोड करायला लावुन शहरातील एका तरुणाची फसवणुक फसवणूक झाली होती.परंतु सायबर पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे गेलेली १ लाख ९४ हजार ५४६/- रुपयेची रक्कम पुन्हा अर्जदारास सायबर पोलीस स्टेशनच्या अंमलदार यांनी मिळवून दिली आहे.
बातमीची हकीकत आशिकी,दि.११ एप्रिल २०२४ रोजी यातील अर्जदार सागर संभार (रा.दिल्लीगेट,सातभाई गल्ली,अहमदनगर) यांना एका इसमाचा फोन येऊन इण्डसिंध बँकेचे क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटवरुन बोलत आहे,तुमचे क्रेडिट कार्ड ॲक्टीव्हेट करण्यासाठी तुमचे क्रेडिट कार्डची माहिती दया व तुम्ही कस्टमर सपोर्ट हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करा असे सांगितलेने तक्रारदार सांगर संभार यांनी ॲप्लीकेशन डाऊनलोड करुन सदर अॅप्लीकेशनचे कोड फोन धारकास सांगितले त्यामुळे अर्जदार सागर संभार यांचे मोबाईलचे अॅक्सेस फोन धारकाकडे गेले होते त्यावरुन अर्जदाराचे मोबाईलचे अॅंक्सेस संबंधीत फोन धारकाकडे जाऊन त्यांचे क्रेडिट कार्डवरुन एकुण १ लाख ९४ हजार ५४६/-रुपये आरोपींनी काढून घेतले होते.
त्यावरुन अर्जदार सागर संभार हे सायबर पोलीस स्टेशनला तक्रार देणे साठी आले होते.सायबर पोलीस ठाण्यातील अंमलदार अभिजीत अरकल यांनी तात्काळ अर्जदार सागर संभार यांचे कड्न सर्व माहिती घेतली व त्यांचे झालेले व्यवहार हे कोठे झाले याबाबत माहिती घेऊन तात्काळ संबंधीत व्हॉलेट नोडल ऑफिसर यांना ईमेलद्दारे पत्रव्यवहार करुन अर्जदार यांचे गेलेले पैसे हे तात्काळ रिफंड करण्यात यावे याबाबत कळविले होते,त्यावरुन संबंधीत व्हॉलेट कंपनी यांनी अर्जदार यांचे गेलेले रुपये हे पुन्हा त्यांचे क्रेडिट कार्डमध्ये वर्ग केले.
सायबर पोलीस स्टेशनने नागरिकांना केले हे आवाहन
नागरीकांना अहवान करण्यात येते की,क्रेडिट कार्ड अॅक्टीव्हेशन करुन देतो, ऑनलाईन KYC अपडेटकरुन देतो, पेट्रोल पंप एजन्सी देतो, अशा आमिषाला बळी पड़ नये प्रत्येक अनोळखी व्यक्तीशी आरथिक व्यवहारकरतांना काळजी ध्यावी. तसेच कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणुक झाल्यास तात्काळ सायबर क्राईम पोर्टलहेल्पलाईन नंबर १९३० यावर तक्रार करावी.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार पोसई/राहुल सानप, पोसई/प्रतिक कोळी, पोना/अभिजीत अरकल यांनी केली आहे.