Maharashtra247

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई लाखोंचा गुटखा जप्त

अहमदनगर (दि.२६ एप्रिल):-लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाटा येथे गुटख्याची वाहतुक करणारऱ्या तीन आरोपीना मुद्देमालासह जेरबंद केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि.२४ एप्रिल रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.श्री. दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे योगेश कटाळे रा.कोपरगांव, व किरण लामखडे रा.घारगांव, ता. संगमनेर या दोघांनी अभय गुप्ता रा.छोटा बांगरदा रोड,इंदौर, मध्यप्रदेश यांचे कडुन महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली व शरीरास अपायकारक होईल असे खादय पदार्थ सुगंधीत तंबाखु व पानमसाला,गुटखा खरेदी केलेला असुन अभय गुप्ता हा त्याचे साथीदारांमार्फत पिकअप गाडी क्रमांक एम.पी. 46.जी.2357 या गाडीमधुन पुणतांबा फाटा येथुन कोपरगांव शहरामध्ये व त्यानंतर घारगांव येथे सुगंधीत तंबाखु व पानमसाला गुटखा पाठविणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती.

माहिती प्राप्त झाल्यानंतर पोनि.श्री. आहेर यांनी पथकास कारवाईबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.पथकाने तात्काळ पुणतांबा फाटा, कोपरगांव येथे जावुन सापळा रचुन थांबले असता बातमीतील नमुद वर्णनाची पिकअप गाडी कोपरगांवचे दिशेने येतांना दिसली.सदर गाडीचालकास गाडी रोडचे कडेला थांबवुन गाडीमध्ये असलेल्या दोन इसमांना त्यांचे नांव गांव विचारली असता त्यांनी त्यांची नावे राजु उमराव भील रा.वार्ड नं.3 गवाडी,ता.निवाली,जि. बडवाणी,मध्यप्रदेश (चालक),मितेश राजु भाबड रा.अंबिकापुरी, पाणी टाकीसमोर,इंदौर, मध्यप्रदेश असे सांगितले.

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांचे कब्जातील पिकअप गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये 4 लाख 35 हजार 600/-रुपये किमतीचा विमल पानमसाला, 48 हजार 400/-रुपये किमतीची वि-1 सुगंधीत तंबाखु, 4,11,840/- रुपये किमतीचा राज निवास सुगंधीत पानमसाला,1,05,60-रुपये किमतीची ZL- 01 जाफरानी सुगंधीत तंबाखु,6,00,000/- रुपये किमतीची पिकअप गाडी क्रमांक एम.पी. 46 जी.2357 असा एकुण 16,01,440/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडे त्यांचे ताब्यात मिळुन आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपुस करता त्यांनी सदरचा गुटखा हा योगेश कटाळे रा.कोपरगांव व किरण लामखडे रा. घारगांव,ता.संगमनेर यांनी इसम नामे अभय गुप्ता रा.छोटा बांगरदा रोड,इंदौर,मध्यप्रदेश याचे कडुन खरेदी केलेला असुन अभय गुप्ता याने सदर गुटखा गाडीमध्ये भरुन पाठविला असल्याचे सांगितल्याने त्यांचे विरुध्द कोपरगांव शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 204/2024 भादवि कलम 328, 188,272,273,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर गुन्ह्यातील फरार आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेत असतांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार इसम नामे योगेश विजय कटाळे रा.खडकी,वार्ड नं 1 कोपरगांव ता. कोपरगांव,जि. अहमदनगर हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पुढील तपासकामी कोपरगांव शहर पोलीस स्टेशनला हजर केले आहे.पुढील तपास कोपरगांव शहर पोलीस ठाणे करीत आहे. सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे,श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार बाळासाहेब मुळीक, मनोहर गोसावी,सचिन अडबल,संतोष खैरे, रणजित जाधव,शिवाजी ढाकणे,रोहित मिसाळ, प्रशांत जाधव यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page