सावेडी नाका येथे ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या फलकाचे आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते अनावरण
अहमदनगर (दि.२७ एप्रिल):-लोकराज्य ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेची स्थापना सावेडी रिक्षा स्टॉप येथे करण्यात आली.
दि.२४ एप्रिल रोजी रोजी सायंकाळी ७ वा.शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या हस्ते लोकराज्य ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी मा.विरोधी पक्षनेते संपत बारस्कर मा.महापौर बाबासाहेब वाकळे,लोकराज्य ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामराजे शिंदे,ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सितारामजी खाकाळ,जिल्हा कार्याध्यक्ष मुकुंद लखापती,शाखाप्रमुख गजू दंडवते,सल्लागार विष्णू काळे,शाखा उपाध्यक्ष,विठ्ठल बारस्कर सहसचिव शिवाजी शिंदे,सदस्य मच्छिंद्र शिंदे,बाबा राऊत आदी उपस्थित होते.
या उद्घाटन प्रसंगी आमदार जगताप म्हणाले की,रिक्षा चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामराजे शिंदे यांचा समाजसेवेत खूप मोठा वाटा आहे आज सावेडी नाका येथे रिक्षा संघटना स्थापन केली प्रत्येक रिक्षा चालक यांना खूप अनेक अडी अडचनी असतात त्यांना सामोरे जावे लागते त्यावेळी त्या दूर करण्यासाठी एक संघटना हवी असते या वेळी रामराजे शिंदे यांनी प्रत्येक वेळी लोकांच्या अडी-अडचणीनां मदतीला धावून जात असताना आज संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडविले जातात व इथून पुढेही संघटनेच्या माध्यमातून रिक्षा चालकांच्या पाठीशी संघटना भक्कम उभी राहील असे आ.जगताप म्हणाले.
यावेळी संंघटनेच्या वतीने आमदार संग्राम जगताप व मा. विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.