
अहमदनगर (दि.२८ एप्रिल):-शस्त्राचा धाक दाखवुन जबरी चोरीचा प्रयत्न व ५ लाखांची खंडणीची धमकी दिलेले ४ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने नुकतेच ताब्यात घेतले आहे.बातमीची हकीगत अशी की,यातील तक्रारदार श्री. अक्षयकुमार सुरेशचंद मुथ्था (रा.वांबोरी, ता.राहुरी जि. अहमदनगर) यांना दि.२० एप्रिल रोजी फोनवरुन तुझ्या मुलीस सुखरुप पहायचे असेल तर ५ लाख रुपये खंडणी द्यावी लागेल असा फोन आला होता परंतु तक्रारदार यांनी खंडणी मागणारे आरोपींना पैसे दिलेले नव्हते.
तक्रारदार हे व्यायामासाठी गेले असतांना पहाटे 05.30 वा.चे सुमारास 04 अनोळखी आरोपींनी धारधार शस्त्राचा धाक दाखवुन त्यांचे डोळ्यामध्ये कोणतातरी स्प्रे मारुन त्यांचे हातातील सोन्याच्या अंगठ्या काढुन घेण्याचा प्रयत्न केला व खंडणी दिली नाही तर परिवाराला संपवुन टाकण्याची धमकी दिली. तक्रारदार यास वेळोवेळी खंडणीसाठी फोन करुन आम्हीच तुझ्यावर हल्ला केला आहे व आता 10 लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. सदर घटनेबाबत तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन राहुरी पोलीस ठाणे गु.र.नं. 521/2024 भादवि कलम 394,384, 506, 507,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर घटनेमुळे वांबोरी परिसरातील व्यापारी वर्गामध्ये भितीचे वातावरण तयार झालेले होते.जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोनी.श्री.दिनेश आहेर पोलीस निरीक्षक यांना गुन्हा उघडकीस आणुन आरोपी अटक करणेबाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन पथकास गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.
पथकाने वांबोरी येथे जावुन फिर्यादीकडुन घटनेबाबत माहिती घेतली असता सदर आरोपी हे अंदाजे 25 ते 30 वयोगटाचे असलेबाबत माहिती प्राप्त झाली.पोलीस पथक फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनाचे आरोपींचा शोध घेत असतांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सदरचा गुन्हा हा नागेश चिमाजी देवकर रा.वांबोरी,ता.राहुरी याने व त्याचे इतर साथीदारांनी केला असुन ते अहमदनगर ते संभाजीनगर जाणारे रोडवरील पांढरीपुल येथे त्यांचेकडील लाल रंगाचे पल्सर मोटारसायकलवर थांबलेले असल्याची माहिती मिळाली.प्राप्त माहितीचे आधारे पथकाने पांढरीपुल या ठिकाणी जावुन खात्री करता एका पानटपरी जवळ लाल रंगाचे पल्सर मोटारसायकल जवळ दोन इसम थांबलेले दिसले.
सदर इसमांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे पुर्ण नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे नागेश चिमाजी देवकर रा.राहुरी वेस,वांबोरी,ता.राहुरी, शशिकांत युवराज सुखदेव रा.शिक्षक कॉलनी,पढेगांव रोड, बेलापुर,ता.श्रीरामपुर, हल्ली रा.सुभाषनगर, वांबोरी,ता.राहुरी,जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे 2 साथीदारांसह केला असल्याचे कळविले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींचे साथीदार नामे बबलु रामदास कुसमुडे रा.राहुरी वेस,वांबोरी, ता. राहुरी,संदीप रामदास कुसमुडे यांचा शोध घेता ते त्यांचे राहते घरी मिळुन आले.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींचे कब्जातुन गुन्ह्याचे वेळी वापरण्यात आलेले मोबाईल, मोटारसायकल असा एकुण 1,64,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासकामी राहुरी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास राहुरी पोलीस ठाणे करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर,श्री. बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीरामपुर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे,रविंद्र कर्डीले, संतोष खैरे,संदीप दरंदले, फुरकान शेख,जालींदर माने,उमाकांत गावडे यांनी केलेली आहे.