Maharashtra247

नारळी सप्ताहात आ. निलेश लंके यांनी घेतले न्यायाचार्य डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांचे आशीर्वाद…

प्रतिनिधी:-बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील घोगस पारगाव या ठिकाणी ऐश्वर्या संपन्न राष्ट्र संत “भगवान बाबा” यांनी सुरू केलेल्या ९० वा नारळी सप्ताह सुरू होता या नारळी सप्ताहाची काल सांगता होती. या ठिकाणी भगवान गडाचे महंत ह.भ.प. डॉ.नामदेव शास्त्री यांच्या काल्याचे कीर्तनाने सांगता झाली.

यावेळी विद्यमान मंत्री धनंजय मुंडे,प्रताप काका ढाकणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,माजी जिल्हा परिषद सदस्य गहिनीनाथ दादा शिरसाट,हे उपस्थित होते. माजी आमदार निलेश लंके यांनी भगवानगडाचे महंत न्यायाचार्य ह.भ.प. डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांचा सन्मान करून आशीर्वाद घेतले. सर्व उपस्थित भाविकांना सप्ताहाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या!

You cannot copy content of this page