घरफोडी करून लाखोंचे सोन्या चांदीचे दागिने लुटणारा जेरबंद एलसीबी टीमची कामगिरी
अहमदनगर (दि.३ एप्रिल):-कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरात घरफोडी करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफिने जेरबंद केले आहे.बातमीची हकिगत अशी की,दि.29 एप्रिल रोजी घटनेतील फिर्यादी श्री.नाना चंद्रभान पवार (रा.नागलवाडी ता.कर्जत) यांच्या बंद घराचे कुलूप तोडुन आत प्रवेश व उचकापचक करुन घरातील 4 लाख 33,000/-हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेले बाबत मिरजगांव पो.स्टे.गु.र.नं. 133/2024 भादविक 454,380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व अंगुलीमुद्रा तज्ञ यांनी घटना ठिकाणी भेट देवुन घटना ठिकाणचे बारकाईने निरीक्षण केले असता घटना ठिकाणी अंगुलीमुद्रा तज्ञ यांना आरोपीचे ठसे आढळुण आले होते.अंगुलीमुद्रा तज्ञ यांनी आढळुण आलेल्या बोटांचे ठशांचे विश्लेषण केले असता सदरचे ठसे हे आरोपी नामे सोमनाथ गणेश मिसाळ (रा.उरुळीकांचन, ता.हवेली,जिल्हा पुणे) याचे असल्याचे निष्पन्न झाले.
त्या अनुषंगाने स्थागुशा पथकाने आरोपीचा शोध घेत असतांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार तो त्याचे राहते घरी आला असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने सदर ठिकाणी जावुन त्यास ताब्यात घेतले. त्याचे कडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याचे सांगितल्याने त्यास पुढील तपासकामी मिरजगांव पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास मिरजगांव पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/सोपान गोरे, अंमलदार विशाल दळवी,रविंद्र कर्डीले, सागर ससाणे,अमृत आढाव,संतोष खैरे, विजय ठोंबरे,भरत बुधवंत यांनी केली आहे.