
नगर (प्रतिनिधी):-पश्चिम बंगाल बारबोणी पोलीस स्टेशन हद्दीतील गु.र.न.62/2024 भादवि कलम 363,365 प्रमाणे मधील अपहरीत पीडित मुलगी वय 14 वर्षे 8 महिने हीस फुस लावून अज्ञात आरोपीने अज्ञात कारणाकरिता पळवून नेले होते.
या बाबत बारबोणी पोलीस स्टेशन पश्चिम बंगाल येथील पोलिस अधिकारी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन अहमदनगर यांच्याशी संपर्क करून सदर पीडित मुलगी व अज्ञात आरोपी हा एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वास्तव्यास आहे अशी माहिती दिली.
दिलेल्या माहितीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि/माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी यातील आरोपी व अपहरित पीडित मुलगी यांची गोपनीय माहिती काढून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हद्दीमध्ये शोध घेतला असता सदर पीडित मुलगी ही आरोपी नामे प्रशांत उर्फ अभिजीत सजोल घोष (रा.पश्चिम बंगाल) याच्या सोबत नागापूर परिसरामध्ये मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पीडित अपहरित मुलगी व आरोपी यास बारबुनी पोलीस स्टेशन पश्चिम बंगाल येथील पोलीस अंमलदार यांच्या ताब्यात देण्यात आले. सदरील कारवाई एम.आय.डी.सी पोलिस ठाण्याचे सपोनि/ माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार यांनी केली आहे.