
अहमदनगर (दि.४ एप्रिल):-महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोमांस व जिवंत जनावरे एकूण 12 लाख 55 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह 5 आरोपीना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पोनि/श्री.दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गोमांस वाहतुक व विक्री करणा-या इसमांची लोणी,राहाता परिसरात फिरुन माहिती घेत असताना पथकास ममदापुर,ता.राहाता या ठिकाणी राहते घरा जवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करण्याची मनाई असताना गोवंशी जातीची जिवंत जनावरांची कत्तल करत असुन गोवंशी जातीची काही जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने निर्दयतेने शेडमध्ये डांबुन ठेवलेले आहे.
आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकाने लागलीच बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करता घराचे लगत असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये 8 इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करतांना दिसुन आले त्यावेळी पथक शेडचे गेट उघडतांना गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसम भिंतीवरुन उड्या मारुन पळुन जावु लागले.पथकाने त्यांचा पाठलाग करुन 3 इसमांना शिताफीने ताब्यात घेतले व उर्वरीत अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले.
ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे इरफान शेरखान पठाण,अनिस नुरा पठाण,जावेद नाजु शेख तिन्ही रा.ममदापुर, ता.राहाता असे असल्याचे सांगितले. त्यांचे कडे पळुन गेलेल्या साथीदारांची नावे व पत्ता विचारले असता अदिल सादिक कुरेशी (फरार),नाजीम आयुब कुरेशी (फरार),वसीम हनीफ कुरेशी (फरार),आरिफ अमीर कुरेशी (फरार),शोएब बुडन कुरेशी (फरार) सर्व रा.ममदापुर, ता. राहाता असे सांगितले.ताब्यातील आरोपींकडे कत्तल केलेल्या गोमांस बाबत अधिक विचारपुस करता त्यांनी कत्तलीसाठी आणलेली जनावरे ही अल्ताफ जलाल शेख याचे घराचे लगत अलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेले असल्याचे सांगुन तो तसेच सुरेश लक्ष्मण खरात व मुम्तजील मुनीर कुरेशी हे कत्तलीसाठी जनावरे आणुन देतात असे सांगितल्याने पथकाने अल्ताफ जलाल शेख याचे घराचे मागील बाजुस असलेल्या पत्र्याचे शेडमधुन 2 इसमास ताब्यात घेतले व 1 इसम पळुन गेला.
ताब्यात घेतलेल्या इसमा त्याचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे सुरेश लक्ष्मण खरात,अल्ताफ जलाल शेख व पळुन गेलेल्या इसमाचे नाव मुम्तजील मुनीर कुरेशी (फरार), सर्व रा.ममदापुर, ता. राहाता असे सांगितले.ताब्यात घेतलेल्या 5 आरोपींचे कब्जात 9,90,000/- रुपये किंमतीचे 3,300 किलो गोमांस व 2,50,000/- रुपये किंमतीची 50 गोवंशीय लहान जनावरे, 15,000/-रुपये किंमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल फोन व 200/- रुपये किंमतीचा 1 लोखंडी सत्तुर असा एकुण 12,55,200/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने सर्व मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुध्द लोणी पो.स्टे.गु.र.नं. 265/2024 भादविक 269, 429, 34 सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलम 5 (अ), (ब), (क), 9 व प्राण्यांना निर्दयतेने वागवीनेचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,श्री. शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी,शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हेमंत थोरात,पोउपनि/तुषार धाकराव व अंमलदार मनोहर गोसावी,अतुल लोटके,गणेश भिंगारदे, राहुल सोळुंके,संदीप दरंदले,संतोष खैरे, भिमराज खर्से,शिवाजी ढाकणे,रणजीत जाधव, बाळासाहेब गुंजाळ, सागर ससाणे,मच्छिंद्र बर्डे,उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर यांनी केलेली आहे.