
संगमनेर (राजेंद्र मेढे):-संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील कै.गं.भा पार्वताबाई शंकर पगारे यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध निमित्ताने पगारे परिवाराच्या वतीने चिंचोली गुरव येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामासाठी ११ हजार १११ रू.ची.देणगी देण्यात आली.
गोरगरीब विद्यार्थ्यांना एक मदत म्हणून व तसेच त्यांच्या शिक्षणाला हातभार म्हणून पगारे कुटुंबीयांच्या वतीने ही देणगी देण्यात आली.यावेळी बाळासाहेब शंकर पगारे, भिवा शंकर पगारे, बाबासाहेब शंकर पगारे, राजेश गणेश पगारे व विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद व तसेच विद्यार्थी उपस्थित होते.