Maharashtra247

नारायणगव्हाणच्या विद्यार्थ्यांचा आण्णा हजारेंकडून झालेला सन्मान हा सर्वात मोठा आशिर्वाद-विद्या पवळे;विद्यार्थ्यांच्या यशाचा होणारा सन्मान हाच खऱ्या अर्थाने शिक्षकांचा गौरवच

 

पारनेर प्रतिनिधी:-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात आवड निर्माण करून आधुनिक शिक्षण प्राप्त करून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहणार असुन विद्यार्थांना मिळणारे यश हिच आमच्या कामाची खरी पावती असुन आजच्या व्यवहारात गणित हा अत्यंत महत्वाचा भाग असुन एव्हरेस्ट ॲबॅकस ॲकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थी कॅल्क्युलेटर पेक्षाही जास्त स्पिडने गणिते सोडवत आहेत.

विद्यार्थ्यांना मिळालेले यश आणि त्यांचा होणार सन्मान हाच आमचा खऱ्या अर्थाने गौरव आहे.

असे (ॲबॅकस शिक्षिका) विद्या पवळे यांनी म्हटले. पारनेर येथे संपन्न झालेल्या २४ व्या नॅशनल लेवल अबॅकस कॉम्पिटिशनमध्ये नारायण गव्हाण अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या कॉम्पिटिशन मध्ये अगदी पाच मिनिटांमध्ये गणिताची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अशी उदाहरणे सोडवली.या कॉम्पिटिशन मध्ये 2000 विद्यार्थी सहभागी होते.या अति तटीच्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी अगदी जीव ओतून उदाहरणे सोडवून उत्तम असे यश संपादन केले.

यामध्ये विद्या शेळके,अनुष्का शेळके सरोदे कृष्णा,खोले वैष्णवी,राजवर्धन शेळके,पवळे राणा, भोसले श्रवण,फटांगडे आरोही,चव्हाण स्वरांजली,शेळके श्रेया, सुपेकर यश,फटांगडे हर्षल,देवश्री शेळके,शेळके पार्थ, शेळके रिद्धी या विद्यार्थ्यांनी उत्तुंग असे यश मिळवलेले आहे. यामध्ये मोलाचे मार्गदर्शन रेश्मा कळमकर,कल्पना घडेकर यांसह सहकाऱ्याचे लाभले गुरु पूर्णिमेचे औचित्य साधून पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते या नॅशनल कॉम्पिटिशन चे बक्षीस वितरण केले गेले या प्रसंगी अण्णा हजारेंकडून केलेल्या मार्गदर्शनातून मुलांना नवीन प्रेरणा मिळाली.विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही प्रगती करावी असे मार्गदर्शन अण्णांनी केले.

विद्यार्थी हेच राष्ट्राची खरी संपत्ती असून,त्यांची शैक्षणिक होणारी उन्नती हीच राष्ट्राची खऱ्या अर्थाने प्रगती आहे,असे आशीर्वाद रुपी कौतुकाची थाप टाकत अण्णांनी विद्यार्थ्यांचा सन्मान केला.

You cannot copy content of this page